Mumbai Congress President : आगामी निवडणुकांच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमध्ये (Mumbai Congress) मोठे फेरबदल झालेत... मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी (Mumbai Congress President) आमदार आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती करण्यात आलीय.. भाई जगताप (Bhai Jagtap) यांची उचलबांगडी करून त्यांची जबाबदारी गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आलीय..  काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी आज ही नियुक्ती जाहीर केली आहे. वर्षा गायकवाड या लागोपाठ चारवेळा धारावी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्यात. त्यांचे वडील दिवंगत एकनाथ गायकवाड यांनीही मुंबई काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया
वर्षा गायकवाड या मुंबईच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. या पदावर नियुक्ती झाल्यानंतर झी 24 तासशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महिला, युवक किंवा सर्व जातीच्या लोकांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं होतं. आता मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेवर देण्यात आली आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, संघटनेत सर्वांना एकत्र घेऊन कसं जाता येईल, हे पाहाणार आहे. येणाऱ्या काळात माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न असेल असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.


भाई जगताप हे मोठे बंधू आहेत, त्यांच्या कामाचा अनुभव आपल्याला उपयोग पडणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. आगामी मु्ंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता संघटना मजबूत करणं, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, पक्षाचं कार्यालय हे प्रत्येक कार्यकर्त्याला कसं घर वाटेल आणि मुंबईकरांच्या समस्यांवर आम्ही आवाज उठवू, आंदोलनं करु असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कर्नाटकमध्ये एक उदाहरण समोर ठेवलं आहे, महाराष्ट्रातही बदल घडतील असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 


काय म्हणाले भाई जगताप
एक महिला अध्यक्ष बनतेय ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे, एक भाऊ म्हणून आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करु असं भाई जगताप यांनी म्हटलंय. दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषद निवजणुकीत काँग्रेसचे प्रथम क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव भाई जगताप यांना भोवल्याची चर्चा सुरु आहे. हंडोरे यांच्या पराभवाची कारणं शोधण्यासाठी काँग्रेसने समिती नेमली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय.