Ashok Chavan With Bjp: अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या आमदरकीचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. विकासाच्या धारेत मला योग्य संधी द्या, बाकी मला कोणतीही अपेक्षा नाही, असे अशोक चव्हाणांनी सांगितल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. यासोबत हजारो कार्यकर्ते भाजपात येत आहे. यावेळी अशोक चव्हाणांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि सुरुवातीलाच त्यांनी मुंबई भाजपऐवजी मुंबई कॉंग्रेस असा उल्लेख केला. 


काय म्हणाले अशोक चव्हाण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष बावनकुळेजी इथपर्यंत सर्वकाही ठिक होत. पण आशिष शेलारांचे नाव घेताना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलारजी असा उल्लेख त्यांनी केला. यानंतर समोर एकच हशा पिकला आणि अशोक चव्हाणांना आपली चूक लक्षात आली. 50 वर्षांची सवय असल्यामुळे....असे स्पष्टीकरण त्यांनी दिली. पहिली पत्रकार परिषद भाजपच्या कार्यालयात होतंय. तेवढ संभाळून घ्या. कालच राजीनामा दिलाय., असे ते पुढे म्हणाले आणि त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार असा उल्लेख केला. 


भाजपसोबत प्रामाणिक


राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. महाराष्ट्राची ही परंपरा राहिली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये मी प्रवेश करत आहे. राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपण योगदान द्यायला हवे, या प्रामाणिक भूमिकेतून हा प्रवेश करतोय. आजपर्यंत विकासाच्या कामात देवेंद्रजी आणि मी, आम्ही एकमेकांना साथ दिली आहे. जिथे मी राहिलोय तिथे मी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे भाजमध्येही मी भाजपमध्ये काम करेल. देशात तर यश मिळेलच पण महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा कशा मिळतील? याकडे लक्ष देईल. 


मला कोणावर वैयक्तिक टीका-टिपणी करायची नाही. व्यक्तीगत आरोप मी कोणावर करणार नाही. पक्षप्रवेशाची फी मी बावनकुळेंना देऊन पक्ष प्रवेश केला आहे. 


आदर्श घोटाळा आरोपावर काय म्हणाले?


आदर्श घोटाळा प्रकरणी दिलासा मिळावा म्हणून अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असा आरोप केला जात आहे. यावर अशोक चव्हाणांनी वक्तव्य केले आहे.  हाय कोर्टाने दिलासा दिला आहे. त्याविरोधात कोण पुढे कोर्टात गेले नाही. मी माझा राजकीय अपघात समजतो. त्याची शिक्षा जितकी मिळायची ती मिळाली, असे स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी आदर्श घोटाळ्यातील आरोपावर दिले. 


जे नेते येऊ शकतात पक्षाला राज्याला फायदा ज्यांना वाटतो योग्य ते पक्षात येतात. अनेक लोका सोबत चर्चा सुरू, जमिन सोबत जोडले नेते त्यांचे स्वागत आम्ही करू असे फडणवीस यावेळी म्हणाले. 


कॉंग्रेस पक्षाला त्यांचे नेते संभाळतां येत नाहीत.  कोणाचे कोणास जमत नाही. कॉंग्रेस पार्टी कोणत्या दिशेन चालली हे समजत नाही. नेत्यांना समजत नाही त्यांचे नेतृत्व काय करते.  घर का संभाळतां येत नाही यांचे आत्मचिंतन करावे असा टोला फडणवीसांनी कॉंग्रेस नेतृत्वाला लगावला.