Ashok Chavan Resignation Latest News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप आलाय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा (Resignation) दिलाय. अशोक चव्हाणांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) जाऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारलाय.. चव्हाण भाजपत (BJP) प्रवेश करणार हे आता जवळपास निश्चित झालंय. चव्हाण दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांना भाजपची मोठी ऑफऱ
अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसंच केंद्रात पुढच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथही घेणार असल्याचं सांगितंल जात आहे. 'झी २४ तास'ला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलीय. भाजपाच्या आज जाहीर होणाऱ्या उमेदवारी यादीत चव्हाणांचं नाव असल्याचं बोललं जातंय.


15 तारखेला प्रवेश करणार
दरम्यान, येत्या 15 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौरा करणार आहेत. संभाजीनगरमध्ये त्यांची सभा होणार असून यावेळी अशोक चव्हाण आणि त्यांचे समर्थक आमदार भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 


अशोक चव्हाण यांचं ट्विट
आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी ट्विट केलंय. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला असं अशोक चव्हाणांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलय.. तसंच आपल्या लेटर हेडवर त्यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला आहे. नांदेडमधल्या भोकर मतदारसंघाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे. 


नाना पटोले यांना कंटाळून बाहेर?
नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय. नाना पटोलेंवर अनेक नेते नाराज आहेत त्यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात काँग्रेस नामशेष होईल असही देशमुखांनी म्हंटलंय. दरम्यान, अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदारही काँग्रेस सोडण्याच्या तयारीत. माजी मंत्री अमित देशमुख, विश्वजीत कदम, संग्राम थोपटे, माधवराव जवळगावकर, अमित झनक, कुणाल पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. 


नाना पटोले दिल्लीत
नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा छत्तीसगडमधल्या बलरामपूरमध्ये आहे. तिथे जाऊन पटोले राहुल गांधींची भेट घेणार आहेत. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासह राज्यातल्या घडामोडींवर या भेटीत चर्चा होणार आहे. तर पटोले उद्या दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत.