Maharashtra Politics : ठिकाण आणि वेळ दोन्हीही ठरलं, शिंदे-ठाकरे एकत्र येणार?
आजी-माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यासाठी ठिकाणही ठरलंय आणि वेळही ठरलीय.. खरं तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे-शिंदे कधीच एकत्र दिसले नाहीत, एकाच व्यासपीठावर सोडा.. दोघांनी एकमेकांसमोर येणंही कटाक्षानं टाळलंय. पण आता शिंदे-ठाकरे एकत्र दिसू शकतात..
Maharashtra Politics : पहाटेचा शपथविधी ते मविआची स्थापना, शिदेंचं बंड ते मुख्यमंत्री होणं.. एखाद्या वेबसिरीजला लाजवतील अशा घडामोडी राज्याच्या राजकीय (Maharashtra Government) पटलावर घडतायत. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) एकत्र येणार आहेत. आजी-माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर दिसणार आहेत. त्यासाठी ठिकाणही ठरलंय आणि वेळही ठरलीय.. खरं तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे-शिंदे कधीच एकत्र दिसले नाहीत, एकाच व्यासपीठावर सोडा.. दोघांनी एकमेकांसमोर येणंही कटाक्षानं टाळलंय. पण आता शिंदे-ठाकरे एकत्र दिसू शकतात..
एकत्र निमित्त आहे ते 23 जानेवारी.. अर्थात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं.. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून या कार्यक्रमाची जोरदार तयारीही सुरु आहे.. याच कार्यक्रमात बाळासाहेबांचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात येऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरणाची घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीस या कार्यक्रमात असतीलच पण सोबतीला ठाकरेही असतील, अशी शक्यता आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना फुटली, इतकंच काय तर आमदार-खासदार-पदाधिकारी-नगरसेवक-भाऊ-बहीण सर्वांमध्ये फूट पडली.
ठाकरे-शिंदे वैर राजकीय न राहता व्यक्तिगत झालं. आता शिंदेंच्या बंडाला 6 महिने झाले. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, ठाकरेंनीही विरोधाची भूमिका स्वीकारलीय. त्यामुळे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी शिंदे-ठाकरे एकत्र येणार का, व्यक्तिगत वैर-राजकीय कटुता संपणार का, याची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळतीलच.