`विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न`; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
Maharashtra Politics : आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि मुंबई पोलीस आयुक्तांना (Mumbai Police) पत्र लिहिलं आहे. अनोळखी व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी पत्रात केला आहे. गायकवाड नामक व्यक्ती वेगवेगळ्या मार्गाने जिवे मारण्याच्या प्रयत्नात असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. यासोबत लाड यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांनाही हे पत्र त्यांनी पाठवले आहे. अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी या पत्रामधून केला आहे.
पत्रामध्ये लाड यांनी गायकवाड नामक व्यक्तीचा उल्लेख केला असून जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात यावी, अशी विनंती या पत्रामधून करण्यात आली आहे.
काय आहे पत्रात?
"राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याबाबत या पत्रात उल्लेख असून याबाबत राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी खार पोलीस स्टेशनला याची रितसर कल्पना दिली होती. त्याचबरोबर यांनी गायकवाड नामक व्यक्तीने जितेंद्र कांबळे व त्याचे दोन सहकारी यांना दगळी चाळ व तसेच चेंबूर येथे घेऊन गेल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गायकवाड नामक व्यकीत वरील नमूद दोन ठिकाणी घेऊन गेला होता. त्याप्रमाणे राहुल कंडागळे तसेच जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गायकवाड व्यक्ती आहे का? याचा तपास होणे आवश्यक आहे. व राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी माहिती दिलेली असताना यावर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मागील आठवड्यात माझ्यासह माझे सहकारी अमित पवार यांच्यावर अनोखळ्या व्यक्तीकडून पाळत ठेवण्यात येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. माझ्या राहत्या घराजवळ व ऑफिसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत पत्रात माहिती देण्यात आली आहे. यातील एक विषय श्रमिक उत्कर्ष सभा या युनियनच्या संबंधित असून तसेच दुसरा विषय हा माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे," असे प्रसाद लाड यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.