Maharashtra Politics : राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोल्डवॉर रंगल्याची चर्चा सुरु झाली आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का दिलाय. साखर कारखान्यांबाबत अजित पवारांनी घेतलेला निर्णय 8 दिवसात मागे घेण्यात आलाय. भाजप नेत्यांच्या (BJP Leaders) कारखान्यांवरील बंधने हटवण्यात आलीय. NCDCने मंजूर केलेले 549 कोटी रुपयांचे कर्ज हवे असल्यास कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारीचे हमीपत्र द्यावे.कारखान्यांच्या जागेच्या सातबाऱ्यावर कर्जाचा बोजा चढवावा तसंच गहाणखत, दस्तावेजावर सह्यांचे अधिकार सरकारला देण्याच्या नव्या अटी लावल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयामुळे कारखानदारांची कोंडी झाली होती. मात्र, अजित पवारांचा हा निर्णय फडणवीसांनी आठच दिवसात मागे घेतलाय. भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची भेट घेतली. यासंदर्भातील शासन निर्णय मागे घेण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.


काय होत्या नवीन लावलेल्या अटी पाहुयात
कारखान्यांच्या संचालकांनी वैयक्तिक सामूहिक जबाबदारीचं हमीपत्र द्यावं, गहाणखत, दस्तावेजावर सह्यांचे अधिकारी सरकारला देण्याच्या अटी, कर्ज वसुली न झाल्यास कारखान्याच्या मालमत्तेच्या विक्रीतून कर्जाची वसुली, संचालक मंडळाचा ठराव देणाऱ्या कारखाान्यांनाच कर्ज मिळणार, अशा अटी लावण्यात आल्या होत्या.


भाजपच्या कोणत्या नेत्यांना दिलासा मिळालाय पाहुयात
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा शंखर सहकारी साखर कारखाना, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, हर्षवर्धन पाटील यांचा निरा-भीमा सहकारी साकर कारखाना, भाजप आमदार अभिमनूय पावर यांचा शेतकरी सहकारी साखर कारखाना, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना, भाजप खासदार धनंजय महाडिर यांचा भीमा सहकारी साखर कारखाना


राधाकृष्ण विखे पाटलांना धक्का
दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याचा फटका भाजपच्या मंत्र्याला बसलाय. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गच्छंती झालीय. विखे-पाटलांऐवजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांची वर्णी लागलीय. मंत्रिमंडळ पायाभूत समितीमध्ये अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार,दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे हे सदस्य आहेत. आता या समितीतून राधाकृष्ण विखे पाटलांची गच्छंती झालीय.. दरम्यान आपण समितीत असलो काय नसलो काय, काहीही अडचण होणार नाही. अशी प्रतिक्रिया विखेंनी दिलीय. तर भाजपात बाहेरुन आलेल्यांना किंमत दिली जात नाही असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी लगावलाय..