अखेर ठरलं! `या` मैदानावर होणार शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा
Shiv sena Dussehara Melava: शिंदे गटाचा दसरा मेळावा ओव्हल किंवा क्रॉस मैदानावर होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आता दसरा मेळवा कुठे होणार याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
Shivsena Dussehara Melava : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिवाजी पार्क येथे कोणत्या गटाचा मेळावा होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण नवरात्रोत्सवाच्या काही दिवस आधीच या वादावर पडदा पडला. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिंदे गटाकडून ओव्हल किंवा क्रॉस मैदानाचा पर्यात ठेवण्यात आला. आता शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मेदानावर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. क्रॉस मैदानावर क्रिकेट खेळपट्टी असल्याने त्याचं नुकसान होऊ नये यासाठी आझाम मैदानाची निवड करण्यात आली आहे.
सदा सरवणकर यांचं ट्विट
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरचा अर्ज शिंदे गटाने मागे घेतला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गेली 50 वर्षे शिवतीर्थावरून ज्वलंत हिंदुत्वाचे विचार अखंड पणे देत आले आहेत. यावर्षी देखील शिवसेनेचा दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा आणि हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचं जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली असं सदा सरवणकर यांनी दिली होती.
शिवाजी पार्कसाठी वाद
शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा दसरा मेळावा (Dussehra Melava), ही शिवसेनेची (Shivsena) ओळख. एक पक्ष, एक मैदान आणि एक नेता. बाळासाहेब ठाकरेंच्या भगव्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकांची होणारी गर्दी, ही शिवसेनेची परंपरा. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ती परंपरा सुरू ठेवली. मात्र शिवसेना फुटल्यानंतर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यावरुन दोन्ही गट अक्षरश: हमरीतुमरीवर आले. गेल्यावर्षीचा संघर्षाचा कित्ता याहीवर्षी गिरवला गेला. शिवसेनेचे दोन्ही गट दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यावर ठाम होते. यासाठी दोन्ही गटांनी शिवाजी पार्कसाठी महापालिकेकडे अर्जही केला.
मागच्या वर्षीचा न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनं आहे. दीड महिन्यापूर्वी मुंबई महापालिकेला पत्र दिलंय. न्यायालयाच्या निकालाची प्रत या वर्षीच्या पत्रासोबत जोडलीय त्यामुळे यावर्षी आम्हाला शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला तर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी आम्हालाच मिळावी असा दावा शिंदे गटानं केला. पण हिंदू सणांमध्ये वाद नकोत अशी भूमिका घेत शिंदे गटाने एक पाऊल मागे घेतलं.