`..तर मी राजकारणातून संन्यास घेईन` मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadanvis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadanvis on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. या प्रश्नांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले, ते एकतर मी केले, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेत. शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामागे मी भक्कमपण उभा राहिलोय, जाणीवपूर्वक नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना जर मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यायचा आहे, आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण करतोय असं वाटलं तर त्याच क्षणी मी राजीनामा देईन, आणि मी राजकारणातून सन्यास घेईन' असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
काय म्हणाले होते मनोज जरांगे
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती 'जंगल आमचं आहे तर वाघ आरक्षणाची शिकार करेल' असं म्हणत जरांगे पाटील यांनी भिडे गुरुजींवर टीका केलीये. देवेंद्र फडणवीसांनी हे नवीन अस्त्र काढलं वाटतंय..पण यांचा झेंडा उचलून कल्याण होणार नाही त्याला आरक्षणच लागेल आम्ही पण छत्रपतींच्या विचाराचे हिंदू आहोत असं जरांगे यांनी म्हंटलं होतं. याआधीही जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा डाव दिसतो .ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे, फडणवीस इतके चीचोरे चाळे का करताय? फडणवीस तुम्हाला हे राज्य रक्त बंबाळ करायचं आहे का? असेही सवाल जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.
फडणवीस यांचं कदम यांना प्रत्यु्त्तर
दरम्यान, राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडा... तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू.. असं थेट आव्हान रामदास कदमांनी (Ramdas Kadam) दिलंय.. याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, त्यामुळे आमची मनं देखील दुखावली जातात, शेवटी आम्ही ही माणसं आहोत, त्याच्या उत्तरादाखल आम्हालाही पन्नास गोष्टी बोलता येतील, जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भाजपाबाबत (BJP) असं बोलणं टाळलं पाहिजे, याबाबत मी एकनाथ शिंदे यांचीशी बोलेन, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.