विधानसभेसाठी मविआचा जबरदस्त प्लान, मुख्यमंत्रीपदाचा चेहराही ठरला?
Maharashtra Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला मविआ एकसंध सामोरे जाणार हे आता स्पष्ट झालंय. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच विधानसभेसाठी मविआचा चेहरा असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय..
सीमा आढे आणि कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सज्ज झाली आहे. मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर चर्चा सुरू असतानाच एक महत्वाची बातमी समोर आलीय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच राज्यातील महाविकास आघाडीचा चेहरा असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात मविआ विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नाहीय. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.
काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना ही माहिती दिल्याचं सुत्रांकडून कळतंय. उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा असतील. मविआ उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेला सामोरे जाणाराय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ठाकरेंचं नाव आताच जाहीर होणार नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणाराय. ठाकरेंनी मविआत केलेलं काम आणि नेतृत्वामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, INDIA आघाडीत असलेल्या छोट्या पक्षांना आघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न करा अशा सूचना काँग्रेस हायकमांडकडून करण्यात आल्या आहेत.
तर महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरला नसल्याचंही थोरातांनी स्पष्ट केलंय...
लोकसभा निवडणुकीत मविआने दमदार कामगिरी केलीय... लोकसभेच्या प्रचारात उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका सर्वांनी पाहिलीय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. लोकसभेला त्याचा मविआला फायदाही झाला.. त्यामुळेच काँग्रेस हायकमांडने विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पसंती दिली असण्याची शक्यता आहे.,.
मविआचा जागावाटप फॉर्म्युला
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 100 जागा लढणार असल्याची माहिती मिळेतय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाटी 80 जागा सोडल्या जाणार? इतर छोट्या घटक पक्षांना 8 ते 12 जागा देण्यावर सहमती झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ज्याच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री? असंही ठरलंय. मविआत वाद टाळण्यासाठी शरद पवारांचा हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तिन्ही पक्षांचे पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर यापुढील काळात बैठका सुरु होणार आहेत. मात्र या बैठका सुरु होण्यापूर्वीच शरद पवार यांनी मविआसमोर जागा वाटपाचे सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतं.