Uddhav Thackeray & Eknath Shinde News : आता बातमी येतेय राजकीय वर्तुळातून...राज्यात सत्ता संघर्ष नवीन वळण घेणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत नव्या पक्ष स्थापन केला. त्यानंतर राज्यात राजकीय भूकंपामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंनी राज्याची सूत्र आपल्या हातात घेतली. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना मिळेल तेव्हा टीका करायला लागले. पण आता या भूकंपानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र येणार आहेत. 


अखेर ठरलं!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकदाही कोणत्या व्यासपीठावर एकत्र आलेले नाहीत. मात्र, आता नव्या वर्षात हे आजी-माजी मुख्यमंत्री मुंबईतील (Mumbai news)  एका कार्यक्रमाता एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. (Maharashtra Politics News cm Eknath Shinde Devendra Fadwanis Uddhav Thackeray will come together on 23 January 2023 marathi news)


हे आहे निमित्त 


राज्यातील राजकारणात कधी काय होणार हे सांगता येतं नाही. राज्यात अनेक कार्यक्रम होत असतात अशावेळी राजकारणातील शूत्र आपल्याला एकाच व्यासपीठावर दिसतात. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यासाठी हे निमित्त समोर आलं आहे.  विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं...या तैलचित्राचं 23 जानेवारीला अनावरण होणार आहे...त्यानिमित्ताने शिंदे, फडणवीस, ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. यावेळी शिंदे आणि ठाकरे संवाद साधणार का...? याकडेच अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असेल...


दरम्यान या कार्यक्रमाला बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन, ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले उपस्थित राहण्याची शक्यता आहे.