Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thakckeray) यांचं नेतृत्व झुगारुन 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेले, 12 खासदार शिंदेंसोबत आहेत, शेकडो नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. हजारो पदाधिकारी ,शिवसैनिक शिंदे गटात आले. आता हे कमी होतं म्हणून की काय राज्याबाहेरचेही शिवसेना पदाधिकारी आता शिंदेंच्या गटात दाखल होत आहेत. 8 राज्यांच्या शिवसेना (Shivsena) प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राज्यांचे प्रदेशप्रमुख शिंदे गटात 
दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मध्यप्रदेश, गोवा 


या 8 राज्यांच्या प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावली आणि एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलंय. निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कुणाची याचा वाद सुरू आहे. शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाणावर दावा केलाय. त्यात 8 राज्यातल्या प्रदेशप्रमुखांनी शिंदेंचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे शिंदे गटाला न्यायालयीन लढाईसाठी मोठा बुस्ट मिळाला असून ठाकरे गटाचं मात्र टेंशन वाढलंय. 


प्रकरण सर्वोच्च न्यायालयात
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आणि शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief) उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas aghadi Government) कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची (Deputy CM) शपथ घेतली. या विरोधात शिवसेनेने शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवले आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलं.