मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांच्या नावाची घोषणा..वडाळ्यात तिरंगी लढत
MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
MNS Third Candidate List : महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 13 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत अमरावतीतून मंगेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक पश्चिममधून दिनकार पाटील आणि चाकूरमधून नरसिंग भिकाणे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. परळीतून अभिजित देशमुख तर विक्रमगडमधून सचिन शिंगाडा यांना तिकिट देण्यात आली आहे. याशिवाय भिवंडी ग्रामीण वनिता कथुरे, पालघर-नरेश कोरडा, शहादा- आत्माराम प्रधान, वडाळा-स्नेहल जाधव, कुर्ला- प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडा-संदीप पाचंगे, गोंदिया-सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जयस्वाल यांना तिकिट देण्यात आलं आहे.
वडाळ्यात तिरंगी लढत
मनसेने वडाळा विधानसभा मतदारसंघातून (Wadala Vidhasabah Constituency) स्नेहल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपने वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून कोळंबकर सातत्याने निवडून येतात. त्यांच्यासमोबर आता स्नेहल जाधव यांचं आव्हान असणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेतून या मतदार संघात श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत जबरदस्त चुरशी होणार आहे.
45 उमेदवारांची यादी
याआधी मनसेने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात माहिम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेष सावंत यांचं आव्हान असणार आहे. याशिवाय वरळी मतदारसंघातही मनेसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मनसेने त्यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांनी तिकिट दिलं आहे.
याशिवाय कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील, ठाणे शहरातून अविनाश जाधव तर चेंबूर मतदारसंघातून माऊली थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.