तर त्याचे पडसाद उमटतील... हल्ल्याप्रकरणी उदय सामंत यांचा इशारा
उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईला वेग,15 जण अटकेत...
Maharashtra Politics : राज्याचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर काल पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पुण्यातील ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलं असून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
हिंगोलीचे ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनाही अटक करण्यात आलीये. थोरात यांनी आमदारांच्या गाड्या फोडा असं चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्याचे पडसाद पुण्यात दिसून आले. याप्रकरणी पुणे पोलिसांनी बबन थोरात यांना अटक केलीय.
उदय सामंत यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या हल्ल्यानंतर आमदार उदय सामंत यांनी इशारा दिला आहे. आम्ही 50 आमदारांना फोन करुन मतदार संघात सांगितलं तर त्याचे पडसाद उमटतील असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे.
दहा लोकांना आतापर्यंत अटक झाली आहे, त्यांच्याकडे हत्यार असल्याचं आढळून आलं आहे. सभेला जाताना कशाला हत्यार घेतली जातात. या हल्लेखोरांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यावर कारवाई नको ही माझी भूमिका असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आम्हाला संघर्ष करायची सवय आहे, आम्ही परशुराम भूमीतून आलो आहे.
ज्या मुलांच्या हातात दगड दिले, त्यांना अटक झाली, आता त्यांना सोडवायला कोण जाणार? मुंबईतून भाषण करणारे आता का जात नाही त्या मुलांना सोडवायला असा सवाल उदय सामंत यांनी उपस्थित केला आहे.