मुंबई :  राज्यात मान्सून जोरात बरसतोय. या मान्सूनबाबत आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध भागांसाठी पुढील 78 तास हे महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. आयएमडीने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (maharashtra rain alert heavy rain in some places in the next 72 hours meteorological department warned)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुढच्या 72 तासांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रात मान्सूनसाठी पुढचे 72 तास अतिशय महत्वाचे ठरणार असल्याचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. विशेषत: कोकण, गोवा, मुंबई सह घाटमाथ्यावरही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेनं वर्तवलाय. पुढे 10,11 तारखेला मान्सूनचा जोर राज्यात थोडासा कमी राहिल. पण 12 जुलैपासून मान्सूनचा आणखी एक स्पेल येण्याची शक्यता आहे. 


विदर्भात जोरदार पाऊस


चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा जबरदस्त फटका बसलाय. मूल तालुक्यातील राजोली गावात लोकांच्या घरात पाणी शिरलंय. ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामूळे घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. 


राजोली गावात सकाळी या मोसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला आणि शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. ग्राम पंचायतने नाले आणि रस्त्याची उंची वाढविल्यामुळे गावात पावसाचं आणि नाल्याचे पाणी शिरल्याचा आरोप होतोय.


वर्ध्यातील आर्वी तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे देऊरवाडा गावातील 110 घरांत पाणी शिरलं. त्यामुळे ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. तालुक्यातील बाराशे हेक्टर पीक जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. 


आर्वी देउरवाडा मार्गावर नालेसफाई न झाल्यानं पाणी साचलं. खूबगाव इथल्या आसुलकर यांच्या शेतातील कुक्कुटपालन शेड मधील 10 हजार कोंबड्यांचाही मृत्यू झाला. देऊरवाडामधल्या नुकसानग्रस्त कुटुंबाची शाळेत व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिलीय.