मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गेल्या 24 ते 48 तासांत (Maharashtra Rain Update) थोडी उसंत घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. (maharashtra rain update 2022 imd weather report heavy rainfall in 5 distric next 4 days)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्या-परवाचे शनिवार-रविवार मुसळधार पावसाचे असतील, असा इशारा देण्यात आला आहे.


पालघर, नाशिक, पुणे, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांत यलो अलर्ट म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे. 


उर्वरित राज्यात कुठे रिमझिम तर कुठे कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसतील. त्यासोबत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.