मुंबई : मुंबईसह राज्यभरात (Mumbai Rain) पावसाने 2 आठवड्यांपासून दडी मारली होती. मात्र मुंबईसह आसपासच्या भागात आज (7 ऑक्टोबर) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. (maharashtra rain update next 3 to 4 hours in state imd alert) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुढच्या तीन-चार तासात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, नगरमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून दिला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे. तर मुंबईनजीकच्या ठाण्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 


भात शेतीला फटका


पालघर जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा भात शेतीला फटका बसलाय. ठिकठिकाणी भातशेती कापणीला सुरुवात झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे कापून शेतात सुकण्यासाठी ठेवलेलं पीक पूर्णपणे नष्ट झालंय. बळीराजा पुन्हा एकदा संकटात आलाय. 


नद्या नाल्यांना पूर


जळगावच्या चाळीसगावात रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. यावेळी शहरातील डोंगरी आणि नदी तितुर नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती शहरातील मुख्य पुलावरून पाणी वाहू लागल्याने काही काळासाठी वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.