राज्यात ६१६९५ कोरोना रूग्णांची नोंद तर ३४९ जणांचा मृत्यू
निर्बंध कडक करूनही नागरिकांच दुर्लक्ष
मुंबई : आज राज्यात ६१,६९५ नवीन रुग्णाांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मतृयदूर १.६३% एवढा वाढला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३०,३६,६५२ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ३६,३९,८५५ नमनुे पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,८७,४७८ व्यक्ती होमक्वारांटाईन मध्ये आहेत.तर २७,२७३ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईन मध्ये आहेत.
मुंबई आज 5,53,404 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ठाण्यात 4,32,779 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे 6,89,274 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
मुंबईत आज 8,217 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. 10,097 रूग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रात आज 61,695 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून53,335 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये 349 कोरोनाबाधितांचा 24 तासांत मृत्यू झाला आहे.
राज्यातल्या ऑक्सीजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करून गरीब व दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय करण्यास मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिली आहेत.