मुंबई : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पातून काय मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.


पाच आठवडे अधिवेशन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ते २८ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. काल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात झाली. या बैठकीत पाच आठवड्यांचा कालावधी निश्चित करण्यात आलाय.


विरोधकांची खलबते


 दरम्यान, विरोधकांनी राज्यसरकारला कोंडीत पडण्यासाठी व्युहरचना केलेय. तशीअधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांत खलबते सुरू झाली आहेत.विधिमंडळातील विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक सायंकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या कार्यालयात झाली. 


अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा


या वेळी प्रामुख्याने अर्थसंकल्प अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, कपिल पाटील, डाव्या आघाडीचे जिवा गावित, कॉंग्रेसचे भाई जगताप, संजय दत्त उपस्थित होते.


सर्व गटनेत्यांची पुढील बैठक २५  फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे.