मुंबई : बातमी राजकीय वर्तुळातून आहे. जिल्हा परिषद (District council) आणि पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti)  पोटनिवडणुकांच्या (By election) तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील एकूण 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरला मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी मदान यांनी दिली. सर्वोच्च न्यायालय आणि कोरोनामुळे पोटनिवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. (Maharashtra State Election Commission has announced the date for by elections of 5 Zilla Parishads and 33 Panchayat Samiti)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 जिल्हा परिषदा 33 पंचायत समित्या


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि विदर्भातील अकोला, वाशिम आणि उपराजधानी नागपूर या जिल्हा परिषदांसाठी या पोटनिवडणुका होणार आहेत. तसेच याच 5 जिल्ह्यांतर्गत असणाऱ्या 33 पंचायत समित्यांसाठी ही पोटनिवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान पार पडणार आहे.


या 5 जिल्हा परिषद आणि त्या जिल्ह्यांमधील पंचायत समित्यांसाठीच्या रिक्त जागांसाठी मतदान 19 जुलैला होणार होतं. मात्र 9 जुलैला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारने कोरोनामुळे पोटनिवडणुका स्थगित कराव्यात, अशी विनंती करेली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने 9 जुलैला निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.