कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी (Maharashtra State Transport Corporation) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मोठा दिलासा दिलाय. एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याचं वेतन देण्यासाठी तब्बल 360 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी राज्य सरकारने 100 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. (maharashtra state government give 100 crore rupees for msrtc employee june 2022 month salary)
 
राज्य शासनाने 2022-23 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 450 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील 300 कोटी रुपयांची तरतूद ही एप्रिल महिन्यासाठी आहे. तर 360 कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत. दरम्यान राज्य सरकारने 100 कोटी देण्याचा निर्णय घेतल्याने एसटी महामंडळाला आणि कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


महामंडळ ‘हर घर तिरंगा’साठी  सज्ज


दरम्यान केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’या अभियानाचं आयोजन केलंय.  या अभियानासाठी एसटी महामंडळ  सज्ज झालं आहे. या अभियानातंर्गत एसटीचे जवळपास 90 हजार कर्मचारी हे आपल्या घरावर तिरंगा फडकणवार आहेत.