मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची यादी मंजूर केली नव्हती. मात्र आता राज्यात नवं सरकार आलं आहे. या नवनिर्वाचित सरकारकडून आता राज्यपालांकडे 12 आमदारांच्या नियुक्तसाठी नावं पाठवली जाणार आहेत. (maharashtra state government will give 12 governor appointed mla list to governor bhagat singh koshyari) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात 3 पक्षांचं सरकार असताना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला होता. महाविकास आघाडीने 12 राज्सपाल नियुक्त आमदार यासाठी लिस्ट पाठवली होती ती विद्यमान रा्जसपाल कोश्यारी यांनी मंजूर केली नव्हती. या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरुन अनेकदा राजकारणही झालं. 


मात्र आता नवं सरकार लवकरच 12 आमदारांच्या नावांची यादी पाठवण्यात येणार आहे. आता राज्य सरकारकडून या 12 जणांच्या यादीत कोणाची नावं असणार, याकडे सर्व इच्छूक मंडळींचं लक्ष असणार आहे.


राज्यपालांना विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेत 12 आमदार नियुक्त करण्याचे अधिकार असतात. या विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या अनुभवाचा फायदा हा सभागृहाला व्हावा, असा हेतू या नियुक्तीमागे असतो.