मुंबई : कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनआक्रोश आंदोलन उभारून काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार असून येत्या ३१ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातून जनआक्रोश आंदोलनाची सुरुवात होणार आहे. 


सरकार मोठ्या जाहीराती करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं सांगतंय. मात्र आता २३लाख शेतकरी बोगस असल्याची बतावणी करतंय याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. तर केंद्रातील सरकारप्रमाणेच राज्यातील सरकार जुमलेबाज असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.