मुंबई : राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात कोरोनासह ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढीस लागली आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या एकूण 1 हजार 179 रुग्णांचं निदान झालं आहे. तर ओमायक्रॉनच्या 23 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनामुळे 19 आणि ओमायक्रॉनमुळे 1 अशा 20 जणांचा मृत्यू झाला आहे. (Maharashtra Today 23 December 2021 1 thousand 179 new cases of corona and 23 new Omicrone patients reported in state)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत किती रुग्ण?


मुंबईतही कोरोनाचा धोका वाढतोय. मुंबईत दिवसभरात 602 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. 


बरे रुग्ण झालेले किती? 


दरम्यान राज्यात दिवसभरात 207 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ही 2 हजार 813 इतकी आहे. 


टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक


राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री 10 वाजता टास्क फोर्सची व्हीसीद्वीरे बैठक घेणार आहेत. या बैठकीत राज्यात नाईट कर्फ्यू लागू करायचा की नाही, याबाबतचा महत्तवपूर्ण निर्णय होऊ शकतो. 


मध्य प्रदेशमध्ये नाईट कर्फ्यू लागू


देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय. पुन्हा कोरोनाचे वाढलेले रुग्ण आणि ओमायक्रॉनमुळे मध्य प्रदेशात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलीय. 


ओमायक्रॉन 200 पार


दरम्यान देशात ओमायक्रॉन रुग्णसंख्या ही 200 च्या पार गेली आहे. राज्यात आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वात जास्त रुग्ण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आढावा बैठक घेतली.


ओमायक्रॉनमुळे आरोग्य यंत्रणेवर किती ताण पडू शकतो आणि त्यादृष्टीने ऑक्सिजनचा पुरवठा, औषधं या सुविधांची किती तयारी करावी लागेल, या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली.