मुंबई :  राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळुरू मत्स्यगंधा एक्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मंगळुरू जं. मंगलोर एक्स्प्रेस आणि दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला जादा अनारक्षित डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे.


संपामुळे एसटी स्थानके ओस पडू लागली आहेत तर रेल्वेत पाय ठेवायलाही जागा नाही अशी स्थिती झाली आहे. प्रशासनाने प्रवाशांची गरसोय टाळण्यासाठी खासगी वाहने, बसेस अधिगृहित करण्याचे गुरुवारी आदेश दिले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले.