Bala Nandgaokar on MNS Journey: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुरुवात खूपच उल्लेखनीय अशी झाली होती. पण यांनतर पक्षातून अनेक नेते दुसऱ्या पक्षात गेले. आमदार फुटले, नगरसेवक फुटले. आता मनसेकडून पुन्हा विधानसभेचे रणशिंग फुकण्यात आले आहे. सर्व जागांवर उमेदवार देणार असे सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह भरलाय. पण मनसेचा प्रवास 13 आमदारवरुन 1 आमदारपर्यंत का झाला? असा प्रश्न सर्वांच्याच पडलेला असतो. मनसेचे पहिल्या फळीतीन नेते बाळा नांदगावकर यांनी या प्रश्नाचे स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 


मनसेचा 13 आमदारावरुन 1 आमदारावर प्रवास का आला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्याकडे सर्व रॉ मटेरियल होते. प्रविण दरेकर, वसंत गीते सारखी अनुभवी मंडळीदेखील होती. पक्षाने जबाबदारी दिली तर त्याला न्याय देण्याचे काम माझे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरण्याचे काम माझे आहे. स्वत:चा मतदार संघात राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरायला हवं होतं. आमची आमदार मंडळी फिरली असती 13 चे 25 आमदार झाले असते. कार्यकर्त्यांना प्रेमाचा हात हवा असतो. त्यांच्या सुख दुखात जाणारा नेता हवा असतो.डोक्यामध्ये हवापण होती, असे त्यावेळी बाळा नांदगावकर म्हणाले.


राजकारणात पुर्वीसारखी समर्पित, एकनिष्ठ लोक आता नाहीत. आता क्वालिटी नाही तर क्वांटीटी आहे. चांगली लोक आली पाहिजेत. मी बाळासाहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटलो. मी राज साहेबांसोबत जातोय. असं सांगितलं. त्यावेळी ते चिडलेसुद्धा. मला पक्षाकडून अनेक प्रलोभन होती. पण मी ठाकरे टू ठाकरे असा प्रवास केला.


अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी बाळा नांदगावकर प्रयत्न करणार का?


दोन ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाला काळ हे उत्तर आहे. समय बलवान है. मला राजकारणात काही नकोय. हे कुटुंब एकत्र आलं तर माझ्यासारखा सुखी कोणी नसेल, असे ते म्हणाले. हे सांगताना बाळा नांदगावकर यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. हे कुटुंब एकत्र आलं तर महाराष्ट्र, मराठी माणूस हिंदू सर्वांच गोमटं होईल. कित्येक मराठी कुटुंब वेगळी झाली आहेत. आम्ही मारामाऱ्या करायला लागलोय. भांडायला लागलो. जे घडायच ते घडलं. पण काळ याला उत्तर देईल. माझी तीव्र इच्छा असून काही उपयोग नाही. पण ठाकरे एकत्र येण्याला माझा हातभार लागला तर मी आनंदी असेन, असे ते यावेळी म्हणाले. 


काय म्हणाले बाळा नांदगावकर?


शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला. शिवसेनेनंतर मनसे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना,उद्धव ठाकरे यांची शिवसेना असे पक्ष निर्माण झाले. शिवसेना फुटली या विषयावर बोलताना बाळा नांदगावकर भावूक झाले.बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून हे क्लिष्ठ आहे. ज्या बाळासाहेबांनी जमिनीवरुन इथपर्यंत आणून ठेवलं, त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. पण बाळासाहेबांनी आम्हाला उभ केलं. ही शिवसेना जर एकसंघ असतील तर या शिवसेनेला आव्हान देण्यासाठी कोणाची माय व्यायली नसती, असे नांदगावकर म्हणाले.