Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Maharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्रावर सत्ता कोणाची? या प्रश्नाचं आता काही दिवसांतच मिळणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. मतदार नेमका कोणाला कौल देतात, कोणत्या युतीवर विश्वास दाखवतात याची उकल होणार आहे. पण, तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निर्धारानं केलेलंय वक्तव्य राजकारणात सर्वांचं लक्ष वेधत आहे.
झी 24 तासशी संवाद साधताना 'टू द पॉईंट' या मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी काही मुद्दे स्पष्टच बोलून दाखवले. यावेळी त्यांनी आपलाच पक्ष विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला. विधानसभेत काय स्कोअर अपेक्षित आहे? असा प्रश्न विचारला असता, 'असं आहे की, मॅच आम्हीच जिंकणार. स्कोअकर आज मी सांगणार नाही. कारण स्कोअर मॅचच्या, इनिंगच्या शेवटीच समजतो. पण, आम्हाला हा आत्मविश्वास आहे की ही मॅच आम्हीच जिंकणार आहोत' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक कोणतीही असली तरीही ती आव्हानात्मकच असते, या वक्तव्यावर जोर देत ही आव्हानं असतानाही आजच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी युती म्हणून महायुती असंच समीकरण आहे, असं फडणवीस म्हणाले. भाजपच्या विजयाची हमी असणारे फडणवीस आणखी नेमकं काय म्हणाले आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं, हे ऐकण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता झी 24 तास ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.
हेसुद्धा वाचा : अदानी शिंदेंचे नवे हिंदुहृदयसम्राट आहेत का? 1500000000000 रुपयांचा उल्लेख करत ठाकरेंच्या सेनेचा सवाल
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कराड मलकापूर इथं भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी सकाळी 11 वाजता सभा घेणार आहेत. तर शिराळा मतदारसंघातील महायुतीचे उमेवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी सभा पार पडणारे. सध्या राज्यातील विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस दौरे करत असून, यानिमित्तानं ते मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहेत.