राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करणार - अजित पवार
राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.
मुंबई : राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २५० आयटीआयच्या सुधारणेसाठी टाटा कन्सलटन्सी १० हजार कोटी रुपये देणार आहे. त्याशिवाय उर्वरित आयटीआयच्या विकासासाठी राज्य सरकार १५०० कोटी रुपये देणाराय, असं सांगतानाच आयटीआय प्रशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी कंपन्यांशी संपर्क साधला जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याआधी सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक झाली होती. त्यावेळी सुशिक्षित तरुणांना कौशल्य विकसित करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी राज्यभरात सहा आयटीआय हब स्थापित चर्चा करण्यावर आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.
काय म्हणालेत अजितदादा?
- राज्यातील ४५० आयटीआयचा कायापालट
- कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २५० आयटीआयच्या सुधारणेसाठी टाटा कन्सलटन्सी १० हजार कोटी रुपये देणार आहे
- आमचा प्रयत्न आहे ४५० आयटीआयमध्ये सुधारणा करण्याचा आहे
- प्रशिक्षणासाठी चांगली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणार, त्यांना नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाले पाहिजे याची काळजी घेतोय
- हे महत्त्वाकांक्षी काम आहे, याचा फायदा तरुणांना होईल
- कंपन्यांशी आम्ही संपर्क करून आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना नोकरी मिळू शकेल
- जे राज्याच्या हिताचं असेल त्याला मुख्यमंत्री पुढे जाण्यास मान्यता देतात
- १५०० कोटी रुपये राज्य शासनाचे आणि १० हजार कोटी रुपये टाटा कन्सलटन्सीचे यात गुंतवले जाणार आहेत