हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक
Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे.
मुंबई : Winter session : हिवाळी अधिवेशानात पहिल्या दिवसापासून विरोध आक्रमक दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. यावेळी अधिवेशन पुढे किती दिवस घ्यायचं याबाबत चर्चा होणार आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Winter Session - Important Meeting of the Working Advisory Committee)
हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस पुन्हा एकदा गाजण्याची आहे. आज कामकाज सल्लागार समितीची सकाळी बैठक होणार आहे. या बैठकीत अधिवेशन पुढे किती दिवस घ्यायचे कामकाज काय करायचे यावर महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या चर्चा होणार आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपांवरही आज उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तर देणारे आहेत. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या संदर्भातही आज चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी आग्रही आहे आता काँग्रेसकडून यासंदर्भात उमेदवार कोण तसेच भाजप उमेदवार देणार का, हे स्पष्ट होईल.
दरम्यान, निलंबित आमदारांच्या ऐवजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करावी, का यावरदेखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस महत्वाचा असणार आहे.