देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी विधीमंडळात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी विधानभवन परिस घोषणा दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरंदरच्या बहिणीला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणी सह अर्थसंकल्पातील गाजर नको. धनगर समाजाच्या हक्काच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केलं. 'फक्त आश्वासन देणाऱ्या सरकारचा महाराष्ट्र यशवंत सेनेकडून निषेध करण्यात येतो. असं बॅनर देखील कार्यकर्त्यांनी झळकावले. महाराष्ट्र यशवंत सैनिकांच्या घोषणांनी यावेली विधानभवन परिसर दुमदुमला.



विधानभवनात घुसणाऱ्या मुंबई प्रमुख धनाजी धायगुडे, आदिनाथ पाटील, बाळासाहेब खांडेकर, राजेश कोळेकर, अमर इंगळे, मोहन महारनुर, दिनेश सोलनकर, आकाश गुरचळ, प्रकाश गुरचळ, दीपक नरुटे, समाधान इरकर, कृष्णा गडदे, शिवाजी ठोंबरे, आकाश खोत या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


पुरंदर घटनेतील आरोपीकडे प्रशासन आणि राज्य सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत महाराष्ट्र यशवंत सेनेच्या सैनिकांनी विधानभवन परिसरात समाजावरील अन्यायाविरुद्ध रोष व्यक्त केला.