मुंबई : राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता सादर केला जाणार आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप - शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. त्यामुळे आज अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार विधानसभेत राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याविना पार पडला. मात्र  अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हवे असेल तर विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर करावी, अशी अट मुख्यमंत्र्यांनी घातली असल्याचे समजते. ही अट ठेवून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांची कोंडी केली आहे. याबाबत काय भूमिका घ्यायची याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे.