नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प पूर्ण व्हावी यासाठी, राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केंद्र सरकारला साकडे घातले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 १४ जिल्ह्यांमध्ये ११४ जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष बाब म्हणून ७ हजार १८० कोटी रुपयांचे आर्थिक सहकार्य केंद्रानं करावं असं राज्यपालांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या राज्यपाल परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रपती भवनात झालेल्या दोन दिवसीय राज्यपाल परिषदमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये नव भारत २०२२ मधील पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास त्याचबरोबर राज्य आणि राजभवनाच्या माध्यमांच्या पुढाकारातून करण्यात आलेले उपक्रम याविषयी चर्चा करण्यात आली. 



या वेळी बोलताना रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यातील समन्वयात सुधारणेची गरजही राज्यपालांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने रेल्वे पोलीस दलात आवश्यकतेप्रमाणे संख्याबळ वाढविण्याची विनंती देखील त्यांनी यावेळी केली.