मुंबई : आज ११ मार्च २०२१, देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri 2021)  उत्साहात साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी फाल्गुन मासच्या कृष्णपक्ष चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त विशेष योग आहे. या दिवशी शिव योगासोबतच सिद्ध योग देखील आहे. अशी आख्यायिका आहे की, या दिवशी जलाभिषेक केल्यास शिव भक्तांवर भगवान शिवची विशेष कृपा असेल. या कृपेमुळे शिव भक्तांची मानसिकता पूर्ण होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाशिवरात्रीच्या दिवशी त्रयोदशी आणि चतुर्दशी तिथी आहे. या दिवशी जलाभिषेक करण्याचे विशेष महत्व आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार, महाशिवरात्री पर्वावर त्रयोदशी आणि चतुर्दशी महत्वाचे असल्याचं म्हटलं जातंय. त्रयोदशी तिथी १० मार्च दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी शुरू होणार आहे. ११ मार्चला २.४० वाजेपर्यंत त्रयोदशी समाप्त होईल. 


शिवलयात त्रयोदशीच्या दिवशी जलाभिषेक ११ मार्च रोजी सकाळी ४.०१ वाजल्यापासून सुरू होणार आहे. चतुर्दशी जलाभिषेकही याच दिवशी दुपारी ३ वाजता सुरू करून संध्याकाळपर्यंत चालेल. 


महाशिवरात्रीची पूजा कशी करावी?


माघ मासात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्व असल्यामुळे तिला महाशिवरात्री म्हटलं जातं. ही महाशिवरात्री त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या यांना स्पर्श करत असेल तर त्याला अधिक महत्व आहे. यंदा 11 मार्च रोजी महाशिवरात्री आहे. हे व्रत आबालवृद्धांनी सगळ्यांनीच करायचं आहे. या दिवशी उपास करून शंकराचं ध्यान करावं. 


सकाळी विधी पाडून कपाळाला भस्माचा त्रिकुंड लावावा. गळ्यात ऋद्राक्षाची माळ घालावी. त्यानंतर हातात पाणी घेऊन संकल्प करावा, हे मी महाशिवरात्रीचं व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पार पडू दे. याचं चांगल फळ मला मिळावं अशी मनोभावे प्रार्थना करावी. 



संध्याकाळी मंदिरात जाऊन सुंगधी फुल, बेलाची पानं शिवलिंगावर अर्पण करावी. नैवेद्य दाखवावा आणि निरांजन ओवाळावं आणि आरती करावी. मात्र, आता कोरोनाच्या काळात गर्दी टाळणं ही आपली जबाबदारी असल्यामुळे मंदिरात न जाता ही पूजा घरीच करावी. 


शंकर हा महायोगी आहे. त्यागी आणि विरागी वृत्तीचा आहे. शंकराकडून त्याचा भोळेपणा घ्यावा. भगवान शंकर भक्तांची इच्छा पूर्ण करतो.