मुंबई : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुनही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मविआ सरकारवर नामुष्की
अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता जो प्रस्ताव मांडण्यात आला, त्या प्रस्तावावरुन हे सरकार किती असुरक्षित हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलं. साठ वर्षांपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने झाली. अगदी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात पाच-सात मतांचा फरक होता, त्याही काळात गुप्त मतदान पद्धतीने झाली. पण 170 मतं आहेत असं सांगणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून ओपन पद्धतीने ही निवडणूक घ्यायची नामुष्की आली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.


याचं कारण त्यांच्यातला जो असंतोष आहे तो हा इतका भयानक आहे, कि त्यांना ही खात्री आहे की गुप्त मतदान पद्धतीने जर निवडणुक घेतली तर त्यांचे आमदार हा असंतोष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्यक्त करतील. आणि त्यांच्यावर नामुष्की येईल, म्हणून त्यांनी नियम बदलण्याचा घाट घातला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


आज सभागृहात नियम समितीचा रिपोर्ट आणताना नियमानुसार दहा दिवसांचा कालावधी दिला पाहिजे, आक्षेप आला तर पुन्हा नियम समितीची बैठक बोलावली पाहिजे, पुन्हा नियम समितीने त्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि ते सभागृहात आलं पाहिजे, ही सर्व प्रक्रिया टाळून चुकीच्या पद्धतीने नियम 57 चा उपयोग करत अत्यंत घाईघाईने आवाजी मतदाने अहवाल मंजूर करुन दहा दिवसांची मुदत एक दिवसावर आणण्याचा प्रयत्न केला.


इतक्या घाई गर्दीत हे करण्यात आलं आहे. पहिल्यांदा नियम समितीच्या बैठकीत अहवाल तयार करुन केवळ भाजपच्या नियम समिती सदस्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. नियम समितीत बहुमत असतानाही त्यांनी भाजपच्या सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. तरीही दुसऱ्या बैठकीत भाजपाच्या सदस्यांनी त्याच्यावर डिसेंट नोट दिली आहे. 


या संदर्भात अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जर यात पाहिलं तर आम्ही पोल मागत होतो, पण पोल देखील देण्यात आलेला नाही. आता हे घोडेबाजार आणि म्हणतात, मग साठ वर्षात घोडेबाजार नव्हता का. आणि कधीच झाला नाही. त्याच्यामुळे हे जे गोंडस नाव देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ते त्यांची असुरक्षितता, घाबरलेले सरकार आहे, आपल्या आमदारांवर विश्वास नसलेलं सरकार हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी बघितलं नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.