दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : खात्याच्या विभाजनावरुन नाराज असलेल्या अशोक चव्हाणांची नाराजी अखेर दूर झाली आहे. वर्षा बंगल्यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसंच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या बैठकीमध्ये जे काही मतभेद आणि गैरसमज होते, ते दूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये या विषयावरुन दीड तास चर्चा झाली. 


एकमेकांची थोडी काळजी घेतली तर महाविकासआघाडी भक्कम होईल- बाळासाहेब थोरात


अशोक चव्हाण नाराज का होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण यांच्या खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांच्याशी चर्चा न करताच तयार करण्यात आला. मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याने अशोक चव्हाण नाराज झाले आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ही नाराजी बोलून दाखवली.


यापूर्वीही अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र, यानंतरही परिस्थिती न सुधारल्यामुळे अशोक चव्हाण यांची नाराजी वाढली होती.


गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, वीज कंपन्यांवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्त्या आदी मुद्द्यांवरून महाविकासआघाडीतील पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं.