मविआचा लोकसभा फॉर्म्युला ठरला, ठाकरे गटाला सर्वाधिक तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. या नुसार शिवसेना ठाकरे गट सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर शरद पवार गटाला सर्वात कमी जागा आल्या आहेत.
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) आणि महाआघाडीत (Mahavikas Aghadi) कोणता पक्ष किती जागा लढणार यावरुन रस्सीखेच सुरु झालीय. या दरम्यान, मविआचा लोकसभा फॉर्म्युला (Loksabha Formula) जवळपास निश्चित झालाय. ठाकरे गट-18, काँग्रेस-17, शरद पवार गट- 10 जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. वंचितला 2 आणि राजू शेट्टींना 1 जागा मिळणार आहे. वंचितला अकोला आणि नांदेड, अमरावती किंवा हिंगोली यापैकी एक तर राजू शेट्टींसाठी (Raju Shetty) हातकणंगलेची जागा सोडण्यात येणार असल्याचं समजतंय. शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरुन या फॉर्म्युल्यावर एकदा अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.
प्रकाश आंबेडकर यांचा इशारा
प्रकाश आंबेडकरांनी ( पत्रकार परिषद घेत मविआला सूचक इशारा दिलाय. आम्ही एकटे लढलो तर किमान 6 जागा जिंकू असं आंबेडकर म्हणालेत. इतकंच नाही तर इज्जत से खाऐंगे असं म्हणत ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा उल्लेख त्यांनी अर्धे तुटलेले पक्ष असा केलाय. प्रत्येक मतदारसंघात अडीच लाख मत आहेत असं म्हणत 48 जागा लढवण्याची तयारी असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय.
पुणे मतदार संघात धंगेकरांना उमेदवारी?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारीची मागणी केलीय. त्यामुळे उमेदवारीसाठी रवींद्र धंगेकर यांनी आपला पत्ता खोललाय. गेल्या काही दिवसांपासून रवींद धंगेकर यांचे उमेदवारीसाठी नाव चर्चेत असतानाच त्यांनी जाहीरपणे उमेदवारी मागितली असल्याचं सांगितलंय.
मविआचा बैठकांचा धडाका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका सुरु केलाय...मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील येवला शासकीय विश्रामगृहात मविआची बैठक झाली...मविआचा दिंडोरीतील उमेदवार लवकरच ठरणार आहे...या बैठकीत दिंडोरी लोकसभेचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला...महाविकास आघाडी घटकातील सर्वच नेते या बैठकीला उपस्थित होते.
रायगडात वातावरण तापलं
लोकसभा निवडणुकीआधीच रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चाललंच तापलंय...शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि लोकसभेचे संभाव्य उमेदवार अनंत गीते यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय .सुनील तटकरे म्हणजे विश्वासघातकी माणूस आहे...बॅरिस्टर अंतुलेंपासून शेकापसह शरद पवार यांचा देखील त्यांनी विश्वासघात केला...अशा विश्वासघातकी माणसाला रायगडची जनता या निवडणुकीत धडा शिकवेल, अशा शब्दांत गीतेंनी तटकरेंवर टीकास्त्र सोडलं.
शिरुरमध्ये अमोल कोल्हेंसमोर कोण?
शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हेंविरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा कायम आहे...मात्र, शिरूरची जागा ही महायुतीत अजित पवार गट लढवेल असं जवळपास निश्चित मानलं जातंय...अशा परिस्थितीत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील आणि ते शिरूर लोकसभेची जागा लढवतील असंही बोललं जातंय...त्यामुळे आढळरावांनी कार्यकर्त्यांसोबत तातडीची बैठक घेतली...या बैठकीत कार्यकर्त्यांनी पक्षचिन्ह कुठलं ही असो तुम्ही पुन्हा खासदार व्हा असा सूर कायम धरत आम्हाला अभिनेता खासदार नको तर नेता खासदार हवा अशी भावना व्यक्त केली...