मुंबई : सध्या 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमात दिसत असलेला अभिनेता - दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राम राम ठोकणार असल्याचं समजतंय. पण, वाढलेल्या कामामुळे राजकीय करिअरला महेश मांजरेकर बाय बाय करणार? असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसंही नाही... मनसेला राम राम ठोकल्यानंतर मांजरेकर दुसऱ्याच एका राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षात सामील होणार असल्याचं सांगितलं जातंय. हा पक्ष म्हणजे सत्ताधारी भाजप नाही, तर मांजरेकर काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हटलं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मिड डे' या वर्तमानपत्रानं ही माहिती दिलीय. मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात 'बिग बॉस' मांजरेकर काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचं यात म्हटलं गेलंय. 


गेले अनेक दिवस मांजरेकर राज ठाकरेंसोबत त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले होते. परंतु, आता मात्र त्यांना काँग्रेस जवळची वाटू लागलीय.