बंडखोर महेश सावंत यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

बंडखोर महेश सावंत आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. महापलिका निवडणुकीत सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड 194 मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांना आव्हान दिलं होतं. पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली होती.
मुंबई : बंडखोर महेश सावंत आज शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणार आहेत. महापलिका निवडणुकीत सावंत यांनी प्रभादेवी वॉर्ड 194 मध्ये बंडखोरी केली होती. पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान यांना आव्हान दिलं होतं. पक्षशिस्तीचं उल्लंघन केल्यामुळे सावंत यांची उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केली होती.
सावंत यांना निवडणुकीत सुमारे 8300 मिळाली होती. पण समाधान सरवणकर यांचा 250 मतांनी निसटता विजय झाला होता. आज दुपारी १२ वाजता उद्धव यांच्या उपस्थितीत 'मातोश्री'वर सावंत याचा पुन्हा प्रवेश होणार आहे.