रुचा वझे /मुंबई : माहीम चौपाटीचे सौंदर्य आता आणखीनच खुलून दिसणार आहे. बीएमसी जी नॉर्थ वॉर्डकडून चौपाटीवर ११०० रोपे लावण्यात येणार आहेत. काही महिन्यातच या ठिकाणी सुरुचीची झाडे, चाफ्याची झाडे डोलताना दिसतील. यासाठी सध्या किनारपट्टीवर काम देखील सुरू झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहीम चौपाटी म्हणजे मुंबईतल्या पर्यटनस्थळपैकी एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. एरवी किनाऱ्यावर मोकळ्या जागेत कचरा आणि घाणीच साम्राज्य पसरायचं. मात्र यावर उपाय म्हणून संपूर्ण चौपाटीचं सुशोभीकरण होईल. मुंबईच्या किनाऱ्यावर वादळी वारे धडकतात तेव्हा यापासून संरक्षणासाठी सुरुची ची झाडे उपयोगी पडतात. माहीम रेतीबंदर इथे ३० हजार चौरस फुटांच्या जागेवर माहीम समुद्राकाठची वाळू सुद्धा आणण्यात आली आहे. 


य प्रकल्पाचे आणखी एक कारण म्हणजे अवैधरित्या करण्यात येणाऱ्या अतिक्रमणापासून देखील चौपाटीचं संरक्षण होईल. सध्या इथे बांबूचे पार्टिशन करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी चार कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


6\