मुंबई : एनआयएने ( NIA ) दाऊद इब्राहिमच्या ( Daud Ibrahim ) मालमत्तेवर टाच आणण्यास सुरवात केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील सुमार २० हुन अधिक ठिकाणी छापे टाकले आहे. तर, दाऊद याचा मुंबईतील सहकारी सलीम फ्रूट याला त्याच्या मुंबईतील निवासस्थानावर छापा टाकून ताब्यात घेतले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनआयएने 'D' गँगशी संबंधित असणाऱ्या दाऊदच्या साथीदारांवर छापे टाकले यात शार्पशूटर, ड्रग्ज तस्कर, 'D'चे रिअल इस्टेट मॅनेजर, गुन्हेगारी सिंडिकेट, हवाला ऑपरेटर यांचा समावेश आहे. तसेच, अंमली पदार्थ तस्कर आणि काही हवाला व्यापाऱ्यांवरही धाडी टाकल्या आहेत.


वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ, सांताक्रूझ आदी ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे. एनआयएच्या मुंबई शाखेच्या 2022 च्या आरसी 1 संदर्भात फेब्रुवारीमध्ये 'D' कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.


मुंबईतील 20 हून अधिक ठिकाणांवर आज एनआयएने छापे टाकले. तर, सांताक्रूझ येथून सलीम फ्रूट याला ताब्यात घेत त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मुंबई NIA ची ही 'D' कंपनीवरील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.