Make Ajit Pawar Chief Minister Of Maharashtra: राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकांचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या माध्यमातून पहिल्यांदाच राज्याला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस असे 2 उपमुख्यमंत्री एकाच वेळेस मिळाले. या राजकीय भूकंपानंतर अनेकदा अजित पवार हेच भविष्यात मुख्यमंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.


थेट गणरायाच्या चरणी लेखी प्रार्थना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरोधकांनीही यामध्ये सूर मिसळत आमदार अपात्रतेमध्ये एकनाथ शिंदेंसहीत 16 आमदार अपात्र ठरल्यास सरकार पडू नये म्हणून अजित पवार गटाला भाजपाने सोबत घेतल्याचे दावेही केले. यामधूनच अनेकदा मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे जाईल याबद्दलच्या चर्चा अधिक अधिक रंगू लागल्या. मागील काही आठवड्यांपासून या चर्चा शांत झाल्या असल्या तरी आता थेट मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपती मंडळाच्या मंडपामध्ये थेट गणरायाच्या पायावर अजित पवारांच्या एका समर्थकाने चक्क लेखी पद्धतीने आपल्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी गणरायाकडे साकडं घातलं आहे.


काय लिहिलं आहे त्या चिठ्ठीत?


अजित पवार मुख्यमंत्री व्हावं असं साकडं त्यांच्या समर्थकांनी लालबाग राजाच्या चरणी घातलंय. बुधवारी (27 सप्टेंबर 2023 रोजी) सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं. अजित पवार यांनी आज सकाळी 'लालबागचा राजा'चं दर्शन घेतलं त्यावेळी त्यांच्याबरोबर खासदार सुनील तटकरे तसेच मुलगा पार्थ पवार हे सुद्धा उपस्थित होते. अजित पवार दर्शनासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांच्या समर्थकांचा एक गटही आला होता. याच गटातील अजित पवारांच्या समर्थकांपैकी एकाने 'लालबागचा राजा'च्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. या चिठ्ठीवर अजित पवार मुख्यमंत्री होऊ दे असं लिहिण्यात आलं होतं. 'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे', असे शब्द असलेली चिठ्ठी अजित पवार समर्थकांनी 'लालबागचा राजा'च्या उजव्या पायावर ठेऊन माथा टेकवल्याचा व्हिडीओ आणि फोटोही समोर आले आहेत.



राष्ट्रवादीचे 9 आमदार आहेत मंत्री


अजित पवार हे मागील 4 महिन्यांपासून सत्तेत सहभागी झाले असून त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सत्तेत सहभागी होताना मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबरोबरच धनंजय मुंडे, अदिती तटकरे यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे.