मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. येथील ५४ नंबर कोर्टात नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई आणि ईडीचे वकील अनिल सिंग यांच्यात युक्तिवाद झाला. 
 
वकील अमित देसाई यांनी नवाब मलिक यांच्यावतीने युक्तिवाद करताना ईडीने समन्स न देता माझ्या घरातून मला त्यांच्या कार्यालयात नेले. त्यानंतर तेथे माझी सही घेण्यात आली. काहीही न सांगता मला घेऊन आले, असा आरोप केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावर ईडीचे वकील अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना 'नवाब मलिक यांच्याकडे असलेली कुर्ला येथील गोवावाला कम्पाउंड जमीन ही हसीना पारकरच्या ताब्यात होती. हसीना पारकर यांनी ही मालमत्ता मरियमकडून घेतली होती.


दाऊद इब्राहिम हा जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत काम करत आहे. हसीना पारकर ही दाऊदची बहीण असून त्याचा मुंबईतील कारभार पाहत होती, असे सांगितले.