मुंबई: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 3 दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुंबईमध्ये पोहोचल्या असून त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी त्यांनी सिद्धिविनायकाकडे मनोभावे प्रार्थना करत साकडं घातलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममता बॅनर्जी पुढचे तीन दिवस मुंबईत असणार आहे. मुंबईत येताच ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायक ट्रस्टचे त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आभारही मानले आहेत. 


उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली होवो अशी प्रार्थना देखील त्यांनी यावेळी केली आहे. नव्या इनिंगआधी ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र तब्येतीच्या कारणामुळे ही भेट होऊ शकणार नाही असं संजय राऊत यांनी ट्वीट करून सांगितलं. 


मुंबई दौऱ्याआधी त्या दिल्लीतही गेल्या होत्या. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी पक्षाच्या विस्तारात व्यस्त आहेत. दिल्लीतही त्यांनी अनेक काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे.



संजय राऊत आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ममता बॅनर्जी यांना भेटणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये ही भेट होणार आहे. 3 दिवसाच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचीही भेट होणार असल्याची माहिती मिळाली आहे.