Toilet Pass At Mumbai Metro Station: मुंबई मेट्रोमधील वॉशरुम वापरायचे असेल तर तुम्हाला आधी एक छोटासा फॉर्म 'टॉयलेट पास' म्हणून भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतरच प्रावाशांना टॉयलेट वापरता येणार आहे. हे आमचं म्हणणं नसून सध्या सोशल मीडियावर या फॉर्मचा एक फोटोच व्हायरल जाला आहे. रेडीटवर एका मेट्रो प्रवाशाने या टॉयलेट पासचा फोटो पोस्ट करत हा अजब दावा केला आहे. मेट्रो स्थानकामधील टॉयलेट वापरण्यासाठी आधी या टॉयलेट पासवरील तपशील भरावा लागणार असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे.


नाव, नंबर, टोकन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मेट्रोने प्रवास करताना या व्यक्तीला वॉशरुम वापरायचं होतं तेव्हा त्याला आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर आधी हा टॉयलेट पास भरुन द्या असं सांगत हातात एक कागद टेवकण्यात आला. या कागदावर वरील भागात 'टॉयलेट पास' अस लिहिलेलं आहे. या वर नाव, मोबाईल नंबर आणि तिकीट टोकन नंबर असा तपशील भरल्यानंतरच मेट्रो स्टेशनवरील टॉयलेट वापरता येणार असल्याचा दावा या प्रवाशाने केला आहे. हा फोटो शेअर करताना या प्रवाशाने एक मजेदार कॅप्शन या फोटोला दिली आहे.


कॅप्शन चर्चेत


"तुम्हाला लघवी करायची आहे तर तुम्हाला अंबानींच्या मेट्रोमध्ये आधी टॉयलेट पासवरील तपशील भरावा लागेल. होय टॉयलेट पास," अशी कॅप्शन या टॉयलेट पासचा फोटो शेअर करताना या व्यक्तीने दिली आहे.



...म्हणून फोन नंबर आणि नाव मागत असावेत


रेडीटवर या पोस्टवर अनेकांच्या उड्या पडल्या. अनेकांनी खरोखरच असा पास भरुन घेतला जातोय याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. तर अनेकांना यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर अचानक नेचर्स कॉल आला तर आधी फॉर्म भरत उभं राहायचं का? असा प्रश्न विचारला आहे. "तुम्हाला लघवी करायची असेल तर आधी फॉर्म भरा मग पैसे भरा आणि वापरा," असा टोला एकाने लगावला आहे. अन्य एकाने, "तुमच्या युरिनचे आणि विष्ठेच्या नमुन्यांचे रिपोर्ट देण्यासाठी त्यांना तुमचं नाव आणि फोन नंबर हवा असणार," असा खोचक टोला लगावला आहे. 


अनेकजण म्हणतात, 'मला नाही सांगितला असा पास भरायला'


मात्र काहींनी हा असला फॉर्म भरुन घेत जात नसल्याचं म्हटलं आहे. "कदाचित तू स्पेशल असशील. मला घटाकोपर मेट्रो स्थानकावर वॉशरुम वापरण्याआधी असा कोणताही पास भरायला सांगितलं नाही," असं अन्य एकाने म्हटलं आहे. काहींनी वॉशरुमचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता यावं यासाठी हे पास तयार केले असतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र असं असलं तरी नाव आणि फोन नंबरसारखी माहिती लघवी करण्यासाठी का दिली पाहिजे हा अनेकांना न उमगलेलं कोडं आहे. एकाने तर 'नशीब ते आधारकार्ड क्रमांक आणि बायोमेट्रीक्स मागत नाहीत', असा टोला लगावला आहे.


मेट्रोचं हे धोरण नेमकं काय?


मुंबई मेट्रोने टॉयलेट वापराच्या सुविधेबाबत लागू केलेले सध्याचे धोरण केवळ स्थानकांच्या सशुल्क क्षेत्रात सर्वसामान्य प्रवाशांना प्रवेश करु देत नाही. परिणामी, प्रवास न करणाऱ्या ग्राहकांना तसेच या क्षेत्राबाहेरील प्रवाशांना थेट शौचालयात प्रवेश करता येत नाही. यावर उपाय म्हणून, मेट्रोने 'टॉयलेट पास' म्हणून ओळखली जाणारी पद्धत सुरू केली आहे. ज्यांना शौचालय वापरण्याचं आहे मात्र ते प्रवास करत नसतील त्यांच्याकडून हा पास भरुन घेतला जातो.