मंजुला शेट्ये मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा
मंजुला शेट्येच्या शवविच्छेदन अहवालात वरीष्ठ अधिका-यांनी फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप महिला कैदी मरियम शेखनं मुंबई किला कोर्टात केलाय.
मुंबई : भायखळा जेलमधल्या मंजुला शेट्ये मृत्यूप्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. मंजुला शेट्येच्या शवविच्छेदन अहवालात वरीष्ठ अधिका-यांनी फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप महिला कैदी मरियम शेखनं मुंबई किला कोर्टात केलाय.
मंजुलावर लैंगिक अत्याचार झाले असून जेजे रुग्णालयाचे डीन तात्याराव लहाने आणि जेलच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी संगनमतानं या अहवालात फेरफार केल्याचा दावा शेखनं केला आहे.
राज्य सरकार, मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसालगीकर, तात्याराव लहाने, कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे, झोन ३ चे पोलीस उपायुक्त, भायखळा जेलचे सुप्रिटेंडेन्ट सी इंदुलकर आणि भायखळा जेलचे मेडीकल ऑफिसर डॉक्टर खान यांना या तक्रारीत प्रतिवादी करण्यात आलं आहे. बड्यांची नावं आल्यानं आता या प्रकरणानं नवं वळण घेतलं आहे.