मुंबई : मंत्रालयातल्या आत्महत्यांवर सरकारनं आता जाळीदार उपाय योजलाय. राज्याचं मुख्यालय असलेल्या मंत्रालयात उडी मारुन होणारे आत्महत्येचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने एक नामी शक्कल काढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या सर्कसमध्ये कसरत करतांना उंचावरुन पडून दुखापत होऊ नये म्हणून जाळी लावली जाते, तशा पद्धतीची जाळी मंत्रालयाच्या दुस-या मजल्यावर लावण्याच्या कामाला सरकारने सुरुवात केलीय. 


त्यामुळे उंचावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रकार घडणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.


गेल्या काही दिवसात मंत्रालयात आत्महत्येच्या प्रयत्नांच्या काही धक्कादायक घटना घडल्या आहे. त्यामुळे सरकारवर जोरदार टीका होतीये. सरकारला विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. तर दुसरीकडे सरकार जनतेच्या समस्या ऎकून घेत नाहीत, अशीही टीका होत आहे. त्यामुळे सरकारने आपली नामुष्की थांबवण्यासाठी हा उपाय शोधून काढलाय.