दीपक भातुसे, मुंबई : कोरोना संसर्ग काळात मंत्रालयातील जवळपास दीड हजार अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या मदतीला देण्याचा राज्य सरकारने आदेश काढला आहे. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मुंबईतील पोलीस ठाण्यात बसून पोलिसांना मदत करणार आहेत. परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी राबवावी जाणारी यंत्रणा आणि केली जाणारी कामं आता मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस ठाण्यात बसून करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. वाधवान कुटुंबाला व्हीआयपी पास दिल्याने अडचणीत आलेल्या गुप्ता यांच्यावरच आता कामगारांना त्यांच्या गावी सोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 


ज्या कामगारांना आपल्या मूळ गावी जायचं आहे त्यांची माहिती एकत्रित करण्याची समितीवर जबाबदारी असणार आहे. त्यासाठी मंत्रालयातील तब्बल 1428 अधिकारी आणि कर्मचारी पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात बसून करणार आहेत.


- ४० वर्षांपेक्षा कमी वय असलेले कर्मचारी आणि अधिकारी यांना काम करावं लागणार
- मुंबई पोलीस आयुक्त यांना पोलीस ठाण्यात नियुक्ती देणार
- आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला असल्याने कर्मचारी, अधिकार्‍यांना पोलीस ठाण्यात रुजू होणं बंधनकारक
- रुजू न होणाऱ्या कर्मचारी, अधिकार्‍यांवर कारवाई होणार