Affordable Houses : मुंबईत आपलं घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न स्वत:हा मुंबईकर ही पाहत असतो. याच स्वप्नच्या मागे मुंबईतील लोकं आपला मासिक पगारातला निम्म्याहून अधिक पगार घरांचे हफ्ते भरण्यात घालवत असल्याचे समोर आलं आहे. यावरुन तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल मुंबईत घर घेणं हे सामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखं नाही. याच कारणामुळे मुंबई हे शहर देशातील सर्वात महागडं घर घेण्यासाठी मार्केट झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी नाइट फ्रँक इंडियानं एक अहवाल सादर केला. त्यात 2023 मध्ये मुंबईत परवडणाऱ्या घरांची मुंबईत घराचं कर्ज फेडण्यासाठी द्यावा लागणारा ईएमआयचा निर्देशांक 51 टक्के इतका आहे. सर्वसामान्यपणे परवडणाऱ्या घरांच्या उपलब्धतेसंदर्भातील मर्यादेपेक्षा हा आकडा फार अधिक आहे. या निर्देशंकावरुन मुंबईत घर घेणं हे विचारांच्या पलीकडे गेलंय की काय असं वाटत आहे. तर गेल्यावर्षी हाच निर्देशांक 52 टक्के इतका होता. कोरोना येण्यापूर्वी हाच निर्देशांक 67 टक्के इतका होता.


2019 पासून मुंबईच्या घर खरेदीमध्ये 16 टक्के लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे, असं नाइट फ्रँक इंडियानं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. मुंबई एक असं शहर आहे जिथे घर विकत घेणं कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. मुंबईत लोकं घर विकत घेताना 50 टक्के कर्ज घेऊन घर विकत घेतात. अशावेळेस बँका क्वचितच सोने किंवा मालमत्तेचीह कागदपत्रे गहाण ठेवायला सांगतात असं देखील या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त ईएमआय परवडणारे मानला जात नाही.


देशातलं अहमदाबाद हे शहर लोकांना घर खरेदीसाठी परवडणारं शहर म्हणून ओळखले जाते. अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या एखाद्या कुंटुबाला त्याच्या उत्पन्नाच्या 21 टक्के इतका भाग घराचा हफ्ता भरण्यासाठी खर्च करावा लागेल. तर 2023 मध्ये अहमदाबाद नंतर कोलकत्ता आणि पुणे या शहरांचा निर्देशांक 24 टक्के इतका झालाय. 


मुंबई मागोमाग हैदराबाद शहर हे देखील घर खरेदी करण्यासाठी सर्वात महागडं शहर आहे. 2022-2023 मध्ये या शहराचा ईएमआयचा निर्देशांक 30 टक्क्यांवर पोहोचला होता. तर 2023 मध्ये घरांच्या किमतीत 11 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली. तर बंगळुरू हे देशातलं घर खरेदी करण्यासाठी चौथ्या क्रमांकाचे सर्वात महागडं शहर आहे. अहवालानुसार बंगळुरू या शहराचा घर खरेदीकरता 2023 मध्ये 26 टक्के निर्देशांक आहे. 2022 मध्ये या शहराचा रेशो एक टक्क्याने वाढला असून 2019 या महामारीच्या काळात हाच रेशो 6 टक्क्यांनी सुधारला होता. तर चेन्नईचा घर खरेदीसाठी परवडणारा निर्देशांक 2022 मध्ये 27 टक्के होता. तर 2023 मध्ये हाच निर्देशांक 25 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. 


"2024-25 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ आणि चलनवाढीचा दर कमी होण्याची अपेक्षा असल्याने, घरांच्या किमती परवडण्याची क्षमता आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. पुढे, जर आरबीआयने 2024 नंतर रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला तर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची देखील अपेक्षा आहे. 2024 मध्ये घरांच्या परवडण्यामध्ये लक्षणीय वाढ दिसून येईल, ज्यामुळे या क्षेत्राला सर्वसमावेशक चालना मिळेल," असे नाइट फ्रँक इंडियाचे चेअरमन शिशिर बैजल म्हणाले.