मुंबई: आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने आता मुंबई बंदची हाक दिली आहे. दादरच्या मराठा मंदिर येथील सभागृहात आज दुपारी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार उद्या (बुधवारी) मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. या बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच शाळांच्या बसेसही सुरु ठेवण्यात येणार आहेत.



उद्याच्या बंददरम्यान कोणतीही हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी केले आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.