मुंबई : मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार आहे. आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केलाय. केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नसल्याने विधानसभा निवडणुकीत २५ ते ३० उमेदवार उभे करणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून सांगण्यात आलंय. उद्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झाला पाहिजे अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाची आहे.  


मराठा क्रांती  मोर्चाची ठळक बाबी :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढवणार
- २५ ते ३० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात,
उद्याचा मुख्यमंत्री मराठा समाजाचा झाला पाहिजे ही भूमिका 
- मराठा आरक्षणानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकारच्या भूमिकेवर समाधानी नाही. 
- आरक्षण मिळालं असलं तरी मराठा समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप आहे.  
-केंद्रात आणि राज्यात मराठा लोकप्रतिनिधी समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत त्यामुळे ठोक मोर्चा येणाऱ्या निवडणूकित उमेदवार उभे करणार  
- कोपर्डी घटनेतील आरोपींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर ताबडतोब अंमलबजावणी करावी, लागू झालेल्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी,
-  आण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक याबाबत सरकारने भूमिका अधांतरी ठेवली आहे त्यांची भूमिका स्पष्ट करावी