मराठा मोर्चादरम्यान `यांनी` बजावली महत्त्वाची भूमिका!
मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं.
मुंबई : मुंबईत मराठा मोर्चाच्या यशस्वी आयोजनात मुंबई पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची ठरलीय. लाखांचा हा मोर्चा मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी अत्यंत जबाबदारीनं आपल्या कर्तव्याचं पालन केलं.
मुंबईच्या एन्ट्री पॉईंटपासून जिजामाता उद्यान, जेजे उड्डाण पुल ते आझाद मैदान या मार्गात वाहतूक पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता.
जे. जे. उड्डाणपुलावर रुग्णवाहिकांसाठी खास ग्रीन चॅनल तयार करण्यात आला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर प्रवाशांना कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी उत्तम नियोजन केलेलं दिसलं.
मुंबई महापालिका प्रशासनानंही त्याला चांगली साथ दिली. पिण्याच्या पाण्यापासून मोबाईल टॉयलेटपर्यंत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या.
रेल्वे प्रशासनानं जादा रेल्वे गाड्या सोडून मुंबईकर आणि मोर्चेकऱ्यांच्या सुखरूप प्रवासाची सोय केली. या नियोजनाबद्दल 'झी मीडिया'कडून तमाम सरकारी यंत्रणांना खास सलाम...